माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खोचक टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनाही टीकेची झोड उठवली आहे.
त्यांनी राज्यातील अवकाळी पावसाने निर्माण झालेल्या संकटावर भाष्य करतानाच महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळलेले असताना स्वत:ला गरीब शेतकऱ्यांचा मुलगा म्हणणारे मुख्यमंत्री तेलंगणा राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला गेले आहेत.
बळीराजाला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात गेले आहेत. शेतकऱ्यांची वाताहत झाली आहे, अशी परिस्थिती असताना आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जायला लाज नाही वाटत, असा हल्लाबोल करतानाच एक फुल प्रचारात आहे, मग दोन हाफ कुठे गेलेत, असा खोचक सवालही ठाकरेंनी केला.