शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि समाजवादी जनता परिवाराची संयुक्त बैठक आज एमआयजी क्लब, वांद्रे येथे पार पडली. समाजवादी परिवारातील विविध संघटनेतील सदस्यांनी ह्यावेळी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती दर्शवली. ‘एक नवीन सुरुवात करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत, हेच प्रेम घेऊन पुढे चालूया‘ असा विचार पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना मांडला.