अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे गटाच्या काही आमदारांना मंत्री पदापासून दुर रहावे लागले. त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. नेमकी तीच बाब माजी मंत्री रामदास कदम यांनी जाहीर सभेतून व्यक्त केली. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले याबद्दल मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद असे सांगितले.अजितदादा थोडे दिवस आमच्यासोबत नसते आले तरी चालले असते असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची कोंडी केली.
भाजपने 15 उमेदवार आधी जाहीर केले. त्याचप्रमाणे शिवसेनेनेही आधी उमेदवार दिले असते तर चित्र वेगळे दिसले असते असे सांगून रामदास कदम पुढे म्हणाले, मोदी आणि शाह यांना सांगा की विधानसभेत आपल्याला 100 उमेदवार द्या. 90 निवडून आणले नाही तर बघा. मोदी आणि शिंदे हे मुस्लिमांच्या विरुद्ध नाही. जेव्हा त्यांना गरज लागेल तेव्हा पहिले हेच धावतील असे ते म्हणाले.