उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कर्जतमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेबाबत मोठे गौप्यस्फोट केले. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार बोलताय ती भाजपची स्क्रिप्ट आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना ठरविण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. भाजपने पक्ष आणि घर फोडली आहेत. आता नेते तुटत नाहीत. म्हणून चारित्र्यावर हल्ला केला जातोय. अजित पवार आणि शिंदे गटाने त्यांचा मार्ग निवडला. त्यांनी तसं जावं. सध्या अजितदादा नाही बोलत नाहीत. तर भाजप बोलतंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रच्या अस्मितेसाठी काम करणारे पक्ष आहेत. या पक्षांना भाजप संपवू पाहात आहे. पण तसं होणार नाही. राज्यातील जनता आमच्यासोबत आहे. भविष्यात महाराष्ट्रात आणि देशात आमचं सरकार येईल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
- Advertisement -