शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ‘तमाम हिंदू माता आणि भगिनींनी, 57 वर्ष झाली आपण परंपरा थांबू दिली नाही. मोडता घालण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण ही परंपरा कायम सुरू आहे. मेळावा संपल्यावर आपण खोकासुराचा वध करणार आहोत. रावण हा शिवभक्त होता, एवढा शिवभक्त असून सुद्धा रामाला त्याला मारावं लागलं होतं. रावणाने सिताला पळवलं होतं. त्यामुळे त्याला मारावं लागलं. आज आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी शिवसेना पक्षाची चिन्ह चोरलं. ज्या प्रकारे हनुमानाने रावणांची लंका दहन केली होती, तशी मशाल धारी शिवसैनिक माझ्यासोबत आहे’, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
सध्या विश्वचषक सुरू आहे, त्यात एक सारखी जाहिरात सुरू आहे. अक्षय कुमार, शाहरुख आणि अजय देवगण हे तिघे येतात आणि दोन दोन बोट दाखवतात. आमच्याकडे सुद्धा तिनं माणसं आहे, ते सुद्धा दोन बोट दाखवत आहे, आमच्याकडे हाफ आहे. ते कमला पसंद आहे, हे कमळा पसंदवाले आहे. पसंद आपली आपली, त्यांना कमला पसंद आहे, यांना कमळ पसंद आहे. तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या’, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.