शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पक्षात पडले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळालं. मात्र सेनाभवन उद्धव ठाकरे यांच्या गटाकडेच आहे. मात्र आता शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट खऱ्या अर्थाने एकमेकांसमोर येणार आहे.
कारण शिवसेना भवनासमोरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या शिवसेनेची शाखा सुरू होत आहे. शाखा क्रमांक १९४ चे आज उद्धघाटन मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे यावेळी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी विशेष बसेसही सोडण्यात येणार आहे. शिवसेना भवनसमोरच स्थानिक आमदार सदा सरवणकर यांची शाखा सुरू होणार असल्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो.