Wednesday, February 28, 2024

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय… वाचा सविस्तर…

मुख्यमंत्री (Eknath Shinde) – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :

✅ मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही

✅ राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार. २ लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार.

✅ ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ६५ वर्षावरील नागरिकांना लाभ देणार

✅ राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबवणार. पायाभूत सुविधा बळकट करणार

✅ उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार

✅ मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार. मध उद्योगाला बळकटी

✅ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी

✅ बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करणार. मूलभूत सुविधा देणार

✅ #शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी

✅ #धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार

✅ सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते

✅ स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता

✅ बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. पतसंस्थांना मजबूत करणार

✅ कोंढाणे लघु प्रकल्पाच्या कामास जादा खर्चास मान्यता

✅ तिवरे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार

✅ नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्धारा अधिनियम

✅ #महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार

✅ कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष

✅ #सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय

✅ गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद

#मंत्रिमंडळनिर्णय
#CabinetDecisions

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles