Monday, June 17, 2024

आशिष शेलार राजकीय संन्यास कोणत्या तारखेला घेणार? निकालानंतर ठाकरे गटाने डिवचले…

महाविकास आघाडीला संपूर्ण महाराष्ट्रात १८ पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून संन्यास घेणार, अशी घोषणा भाजपाचे आमदार आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर निकाल अगदी उलटे लागल्याचे दिसते. महायुती १८ ते १९ जागांवर मर्यादीत राहिली असून महाविकास आघाडीने २९ ते ३० जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाकडून आता आशिष शेलार यांना डिवचण्यात येत आहे.

https://x.com/andharesushama/status/1797955235144679562

उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर ट्विट करत आशिष शेलार यांना टोला लगावला आहे. “आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा ना… म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी, लोटी, सगळं देता येईल”, अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles