Tuesday, April 29, 2025

अजित पवार हे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यातील वडा…राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी वडापाव महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं. वडापाव पाहिल्यानंतर आपल्याला राज्यातील राजकारणाची आठवण येते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधला वडा आहेत, असं मिश्किल वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर श्रोत्यांमध्ये एकच हशा पिकला.

वडापाव खातखात ही पिढी उभी राहिली. पुढची पिढीदेखील उभ्या राहत आहेत. खरंतर अशोकराव वैद्य यांचे आभार मानले पाहिजेत, त्यांनी या वडापाववर किती पिढ्या घडवल्यात, आणि किती गाड्या केल्या. ती चवच वेगळी असते. आज हा काही भाषणाचा विषय नाही. पण मला गेल्या वर्षभरापासून वडापाव पाहिला की आताच्या राज्यातील सरकारची आठवण येते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला वडा अजित पवार आहे की, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधला वडा एकनाथ शिंदे आहे? की वाईस वर्सा जे काय असेल ते”, असा मिश्किल टोला राज ठाकरे यांनी लगावला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles