अहमदनगर-३५वर्षीय तरुणाचा त्याच्या राहत्या घरी धारधार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ शिवारात घडली आहे
योगेश सुभाष शेळके वय ३५ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे खून कोणत्या कारणाने झाला याबाबत अजून काही माहिती समजली नाही आज मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास तोंड बांधून आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी योगेश शेळके यांचा त्यांच्या राहत्या घरी खून केल्याची माहिती समजली आहे बेलवंडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे या खुनाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे