नेवासा तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या वादातून पुतण्याने चुलत्याची खून केल्याची घटना नेवासा तालुक्यातील वांजोळी येथे घडली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील वांजोळी येथील गवाजी रामकृष्ण खंडागळे (वय. ५४) यांचा पुतण्या पोपट उर्फ पप्पू भिकाजी खंडागळे याने डोक्यावर लोखंडी गजाने वार केला. त्यात ते गतप्राण झाले.
काल सायंकाळी त्यांच्यामध्ये शेतीच्या वादातून शाब्दिक बाचाबाची झाली असल्याचे समजले. सकाळी काही मध्यस्थी लोकांकडून वाद मिटवण्यात येणार होते. परंतु सकाळी पुन्हा: पुतण्या चा राग उफाळून आला. चुलता घराबाहेर पडलेल्या पाहताच पुतण्या लागलीच मागावुन जात चुलत्याचा खुन केला.
आरोपी स्वत हुन सोनई पोलीस ठाण्यात हजर होत खुनाची कबुली दिली. घटनेची माहिती कळताच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील व सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालु होते.