Friday, February 23, 2024

नगर तालुक्यातील प्रेमप्रकरणातून युवकाची हत्या,चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा कायम

प्रेमप्रकरणातून युवकाची निर्घृण हत्या, चार आरोपींना झालेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयातही कायम

अहमदनगर
आरोपी सतीश बन्सी लगड( वय-२० वर्षे), बन्सी किसन लगड, (वय ५० वर्षे), किसन गणपत लगड, (वय ७२ वर्षे), आशाबाई बन्सी लगड(वय -४५ वर्षे, सर्व रा.वापनई मळा, आठवड शिवार, ता. जि. अहमदनगर), यांनी युवकाचा खुन केल्याप्रकरणी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी, वरील सर्व आरोपीस भा.द.वि.का.क. ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी १,०००/- रू. दंड व दंड न भरल्यास ३ महिने साथी कैद, भा.द.वि.का.क. ३२४ अन्वये ३ महीने सक्त मजुरी व प्रत्येकी ५००/- रू.दंड व दंड न भरल्यास १ महिना साथी कैद अशी शिक्षा ठोठावली होती. सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता श्रीमती पुष्णा कापसे (गायके )यांनी काम पाहिले होते. सदर शिक्षेविरुध्द आरोपीतांनी उच्च न्यायालय , छत्रपती संभाजीनगर येथे अपिल दाखल केले होते. अपिलाचा निकाल नुकताच उच्च न्यायालयात लागला असून त्यामध्ये आरोपीना झालेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली.उच्च न्यायालयातही अहमदनगर सत्र न्यायालयात सरकारी वकीलांनी सादर केलला पुरावा व युक्तीवाद ग्राहय धरण्यात आला. येथील सत्र न्यायालयात १८ साक्षीदार तपासण्यात आले होते.
सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी कि,
फिर्यादी बाळासाहेब होगाजी मोरे व वर नमुद सर्व आरोपी हे एकाच गावात जवळ -जवळ राहणारे होते. आरोपी बन्सी किसन लगड याची मुलगी हिचे मयत दत्तात्रय बाळासाहेब मोरे सोबत प्रेमसंबंध होते व ती दत्तात्रय सोबत लग्न करायचे आहे असे म्हणत होती. घटनेच्या साधारण दोन महिने आगोदर नमुद आरोपींनी दत्तात्रय यास मारून टाकणेबाबत धमकी दिलेली होती. नमुद प्रेमसंबंधाना आरोपींचा विरोध होता. दि. १२/०३/२०१५ रोजी मयत दत्तात्रय याने त्याने घरी परडी पुजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यकमाकरीता दत्तात्रय हा साधारण सायं. ७ वाजता सुमारास गावातील महिलांना कार्यक्रमाकरीता बोलवायला गेला होता व सायं. ७.३० वा. सुमारास तो परत आला व घरासमोर मोटारसायकल लावत असताना वर नमुद आरोपी यांनी वर नमुद गोष्टीचा राग मनात धरून, संगनमत करून फिर्यादीचा मुलगा दत्तात्रय बाळासाहेब मोरे यास पाठीवर धारदार हत्याराने वार करून त्याचा खुन केला. दत्तात्रयचा आवाज ऐकून फिर्यादी व त्यांची पत्नी गयाबाई व मुलगी मेघा हे सोडविण्यास गेले असता त्यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण केली. तद्नंतर सदर घटनेबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदविण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास स.पो. नि. व्ही.डी. चव्हाण व स.पो.नि. टी. एम आढावू यांनी करून आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles