Saturday, April 26, 2025

अहमदनगर एमआयडीसी परिसरात युवकाचा खून, तीन आरोपी जेरबंद

अहमदनगर (दि.९ डिसेंबर):-परप्रांतीय इसमाला निर्जनस्थळी घेवून जावुन त्याचा निघृण खुन करणा-या सराईत तीन गुन्हेगारांना जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे.
बातमीतील हकीकत अशी की,दि.०७ डिसेंबर २०२३ रोजी फिर्यादी दुर्गादेवी ओमप्रकाश महतो (वार्ड नंबर २० गाव छठिया पोखरा पोस्ट डुमराव बक्सर बिहार हल्ली राहणार शिवालय कंपनी एमआयडीसी अहमदनगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की,दिनांक ०६ /१२ /२०२३ रोजी रात्री ०८/०० ते दिनांक ०७/१२/२०२३ रोजी सकाळी ०८/३० वा चे दरम्यान माझे पती नामे ओमप्रकाश राबचना महतो यांचा प्लॉट नंबर एफ ७१ चे पाठीमागे एमआयडीसी अहमदनगर येथे कोणीतरी अज्ञात आरोपीनी अज्ञात कारणाकरीता त्यांचे डोक्यात पाठीमागुन वार करुन त्यांना गंभीर जखमी करुन जिवंत ठार मारले आहे.

या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोस्टे गु रजि नंबर १९०३/२०२३ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि/राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की,सदर गुन्हयातील आरोपी नामे १)विश्वास नामदेव गायकवाड वय रा.श्रीस्टाईल चौक एमआयडीसी अहमदनगर २) अक्षय उर्फ शंभो प्रकाश सकट वय २३ वर्ष रा. पिंपळगाव कौडा ता.जि.अहमदनगर यांनी केला असुन ते औरंगाबाद कडुन अहमदनगरच्या दिशेने येत आहेत.

त्यावरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन चे तपास पथक या आरोपींना पकडण्याकरीता रवाना झाले. वरील आरोपी हे हॉटेल इंद्रायणी कडुन तपोवन रोडकडे येत असतांना पडक्या महालाजवळ तपोवन रोड येथे पोलिसांनी सापळा लावला. आरोपी हे विना नंबरच्या स्कुटीवर येत असतांना ते पोलीसांना पाहुन पळुन जावु लागले त्यावेळी सपोनि राजेंद्र सानप व तपास पथकातील अमंलदार यांनी सदर आरोपींना शिताफीने पाठलाग करुन पकडले.

त्यावेळी त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १)विश्वास नामदेव गायकवाड रा.श्रीस्टाईल चौक एमआयडीसी अहमदनगर २) अक्षय उर्फ शंभो प्रकाश सकट रा.पिंपळगाव कौडा ता.जि. अहमदनगर ३) राहुल अशोक धोत्रे रा.बजाजनगर ता.जि.छत्रपती संभाजीनगर अशी सांगीतले. सदर आरोपींना पोलीस स्टेशनला घेवुन येवुन त्यांना सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले यातील परप्रातीय मयत नामे ओमप्रकाश राबचना महतो याचे व आमचे दारु पिउन भांडणे झाले होते त्यावरुन आम्ही त्याचे डोक्यात लाकडी दांडके मारुन त्याला जिवंत ठार मारले असे सांगुन सदर गुन्हयाची कबुली दिली आहे.यातील तीनही आरोपी हे सराईत असुन त्यांचे विरुदध पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

हि कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोहेकॉ/नंदकुमार सांगळे, पोहेकॉ/नितीन उगलमुगले,पोना/साबीर शेख,पोना/विष्णु भागवत,पोना/राजु सुद्रिक, पोना/महेश बोरुडे,पोना/संतोष नेहुल,पोकॉ/किशोर जाधव,पोशि/नवनाथ दहिफळे,पोकॉ/सचिन हरदास चापोहेकॉ/गिरवले,तसेच मोबाईल सेल अहमदनगरचे पोकॉ/राहुल गुंडु,पोकॉ/नितीन शिंदे यांनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles