संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी, माझ्याजवळचा असला तरी सोडू नका

0
32

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय मुंडे यांच्या जवळचे असेलेले वाल्मिक कराड यांचेही नाव समोर येत आहे. कराड यांचे नाव घेत अनेक आमदारांनी त्यांच्यावर टीका केली आहे. अशात विरोधक धनंजय मुंडेंनाही यावरून लक्ष्य करत आहेत. आज कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी असे म्हटले आहे. याचबरोबर या प्रकरणात मा‍झ्या जवळचा कोणी असेल तर त्यालाही सोडून नक असे ते म्हटले आहेत.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुंडे म्हणाले की, “जिथे माझी बैठक होती, तिथेच मुख्यमंत्र्यांचीही बैठक होती. त्यावेळी योगायोगने आमची भेट झाली. ज्या देशमुखांची हत्या झाली आणि ज्यांनी कोणी हे केले ते फासावर जायला पाहिजेत या मताचा मी आहे. ते शेवटी माझ्या जिल्ह्यातील एक सरपंच होते. मलाही त्यांच्याबाबतीत तेवढाच आदर आहे. जे कोणी गुन्हेगार आहेत, त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा. मग तो कोणाच्याही जवळचा असो. अगदी माझ्या जवळाचा असेल तर त्यालाही सोडायचे नाही म्हणत असताना, माझ्यावर आरोप करण्यामागे काय राजकारण असेल हे आपण समजू शकता.”