Wednesday, April 17, 2024

नगर शहरात खळबळ….. उड्डाणपूलावरून इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याने मारली उडी

नगर – शहरातील उड्डाणपूलावरून इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि.४) सायंकाळी स्टेट बँक चौकात घडली. आण्णासाहेब नामदेव पवार (पूर्ण नाव माहिती नाही, रा. गंगापूर) असे त्याचे नाव आहे. तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पवार हा गंगापूर तालुक्यातील असून नगर शहरातील एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये तिसर्‍या वर्षात शिक्षण घेतो. तो सोमवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास उड्डाणपूलावर गेला होता. त्याने स्टेट बँक चौकात उड्डाणपूलावरून उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला. याची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक नागरिकांनी त्याला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले. त्याने उड्डाणपूलावरून उड्डी का मारली याची माहिती समजू शकली नाही. त्याच्यावर उपचार सुरु असून तो अजूनही जबाब देण्याच्या अवस्थेत नाही, त्याचा जबाब नोंदवल्यावरच त्याने हे पाऊल का उचलले याचा उलगडा होईल असे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles