नगर : नगर शहराच्या विकासाला चालना देणारा आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नगरला मानांकन प्राप्त करून देत मोठा निधी नगर शहराला प्राप्त करून देणारा कल्पक अधिकारी आयुक्तपदी यशवंत डांगे यांच्या रूपाने नगरला मिळाला आहे. नगर शहराच्या विकासाला खीळ बसविणाऱ्या ब्लॅक मेलर्स,माहिती अधिकार कार्यकर्ते, राजकीय पोळी भाजनारे नेते यांना डांगे यांनी नेहमीच बाहेरचा रस्ता दाखवला होता. कोरोना काळात दोन वर्ष ते नगर महानगरपालिकेचे उपायुक्त होते. या काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. मनापाचे अन्नछत्र, नगर औरंगाबाद रोडवर कोविड सेंटर, मोफत लसीकरण केंद्र सुरु केले. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.या काळात कॅन्टोन्मेंट झोन याची काटेकोर अंमलबजावणी यांनी केली. अमरधाम बरोबरच सावेडी येथे तातडीची अंत्यविधीची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळे या काळातील अंत्यविधीची मोठी गैरसोय टळली.नंतर आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात त्यांनी नगरला मानांकन मिळवून दिले. त्यामुळे बक्षीस रूपाने नगरला मोठा निधी आणि योजना मिळाल्या. या निधीमधून नगर शहरातील अनेक सौंदर्यकरणाचे कामे होऊन. विकास कामे मार्गी लागली आहेत.
यापूर्वी त्यांनी राहुरी,शिर्डी,फलटण,कराड या ठिकाणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले व नगरपालिकेला पुरस्कार प्राप्त करून दिले.पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे सहाय्यक आयुक्त या पदावर देखील कार्यरत होते तेथील कामगिरी देखील उल्लेखनीय होती.
पालिकेत या टेबल वरून त्या टेबलवर फिरणारे ब्लॅकमेलर्स माहिती अधिकार कार्यकर्ते यांना बाहेरचा रस्ता डांगे यांनी दाखवलेला होता. त्यांच्यासमोर या सर्वपक्षीय माहिती अधिकार ब्लॅकमेलनची डाळ कधीच शिजली नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. पालिकेत भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ म्हणून डांगे पुरते भारी पडतील असे सर्वांना वाटते आहे. पालिका कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना या पुढील काळात कारभार करणे भाग आहे कारण पालिकेची सूत्रे दबंग डॅशिंग अधिकारी डांगे यांच्या हातात आली आहेत.