बीड जिल्ह्यात रेल्वे धावावी, बीडच्या नागरिकांनाही मुंबईपर्यंत रेल्वेने प्रवास करता यावा हे स्वप्न दिवंगत भाजप नेते आणि माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलं होत. आता, ते स्वप्न सत्यात उतरत आहे. नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला आहे. अमळनेर ते विघनवाडी नवीन रेल्वे लोहमार्गाची आज चाचणी घेण्यात आली. शिरूर कासार तालुक्यात विघनवाडीला रेल्वेचे आगमन झाले. रेल्वे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच रेल्वे आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचे तालुकावासियातर्फे नागरीकांनी मोटारमनचे स्वागत केले. नगर बीड परळी रेल्वे प्रकल्पाला यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात 275 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी सातत्याने येथील लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत.