Monday, September 16, 2024

नगर शहर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला ! बैठकीत या नावाची चर्चा

अहमदनगर-आगामी विधानसभेच्या अनुशंघाने अद्याप तिकीट वाटप झालेले नाही. महाविकास आघाडीत तीन पक्ष असल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे.त्यामुळे नगर शहरची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीस सुटणार की ठाकरे गटाला सुटणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. परंतु आता ही जागा शिवसेना ठाकरे गटाला ही जागा सुटेल असे दिसत आहे.शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मंगळवारी नगर शहरात दक्षिण जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला.

प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी शहरातील काही निवडक पदाधिकाऱ्यांशी शहरातील इच्छुक उमेदवारांबाबत स्वतंत्रपणे चर्चा केली.या बैठकीत शहरातून जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व माजी आमदार स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड यांची नावे सुचवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शहरातून माजी महापौर भगवान फुलसौंदर,शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. गेल्या काही दिवसांपासून शशिकला राठोड यांचेही नाव चर्चेत आले आहे.काल काही पदाधिकाऱ्यांनी खासदार सावंत यांची भेट घेऊन शशिकला राठोड किंवा शशिकांत गाडे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली असल्याचे समजते.

खासदार अरविंद सावंत यांनी दक्षिणेतील सर्व विधानसभा क्षेत्रातील पक्षाचा संघटनात्मक आढावा घेतला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचना व संघटनात्मक कार्यक्रमाबाबत सूचना केल्या.कोणाशीही स्वतंत्र चर्चा केली नाही. इच्छुक उमेदवारांबाबतही चर्चा झाली नाही अशी माहिती संभाजी कदम (शहखमुख, नगर शहर) यांनी दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles