नगरचे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री मा.श्री.नितीन गडकरी साहेब यांची दिल्ली येथे भेट घेऊन नगर मनमाड रोड बाबत चर्चा केली.
याच महिन्यात नवीन टेंडर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन यावेळी गडकरी दिले.
तसेच सावळी विहीर बु. येथील अपूर्ण उड्डाणपुलाचे काम देखील स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन पूर्ण केले जाईल असे त्यांनी सांगितले.