Sunday, December 8, 2024

शिवसेने नंतर नगर शहरात मनसेला खिंडार, ‘या’ पदाधिकाऱ्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

नगर : नगरकरांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहत शहर विकासाची विविध कामे मार्गी लावली असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युवक मोठ्या संख्येने प्रवेश करत आहे, समाजामध्ये विविध प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी युवकांची खरी गरज आहे, टीम वर्कच्या माध्यमातून चांगले काम उभे राहत असते, जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना घेऊन जाण्यासाठी मदत होत असते, युवकांनी देखील समाजामध्ये वावरत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चांगले काम उभे करावे मिळालेल्या पदाचा उपयोग जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा जेणेकरून नागरिकांचा विश्वास संपादन होत असतो असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक परेश पुरोहित व कल्याण रोड येथील गणेश अमाराळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, यावेळी आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्तीपत्र आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. अरविंद शिंदे,माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विद्यार्थी सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर, एडवोकेट युवराज शिंदे,परेश पुरोहित, रवी उपाध्ये, शुभम गंगेकर, रवींद्र भंडारी, अनिल राऊत, समीर ओझा, राहुल ओझा, व्यंकटेश ओझा, स्वप्नील भिंगारे, भगवान पवार, स्वप्नील शिरसाठ, अमोल भिंगारे,विशाल धायतडक, शुभम बाबर, आकाश हरबा आदींचा प्रवेश सोहळा पार पडला
युवराज शिंदे म्हणाले की, कल्याण रोड परिसरामध्ये आमदार संग्राम जगताप यांनी विकासाची कामे मार्गी लावली असल्यामुळे या परिसरातील युवक मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत, असे ते म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles