नगर : शहराच्या नामांतराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथील कार्यक्रमात केली होती. त्यानंतर अनेक दिवस हा प्रस्ताव तसाच पडून होता आयुक्त यांनी प्रस्ताव तयार करून राज्य शासनाला पाठविला व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत नामांतराचा विषय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत घेतला व मंत्रिमंडळाने प्रस्तावाला मंजुरी दिली. आता लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर या प्रस्तावाला केंद्र सरकार मंजुरी देईल व नगर शहराचे नाव अहिल्या नगर शहर म्हणून ओळखले जाईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
नगर शहराचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केल्याबद्दल शहराचे आ. संग्राम जगताप व मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांचा हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने नागरी सत्कार संपन्न झाला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव संपूर्ण देशाला माहित आहे. त्यांचा इतिहास खूप मोठा आहे एक महिला असून त्यांनी समाजाला दिशा व प्रेरणा दिली आहे मंदिरांच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. विकास कामाच्या माध्यमातून भविष्यकाळात विकसित अहिल्यानगर शहर म्हणून ओळखले जाणार आहे. असे मत आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.