Saturday, January 25, 2025

अटी शिथिल करून नगर-शिर्डी रस्त्याचे काम मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती खा. लंके यांचा पाठपुरावा

नगर : प्रतिनिधी नगर-शिर्डी रस्त्याचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम आता अल्प निविदा प्रसिध्द करून अडीच हजार कोटी रूपये खर्चाचा हा प्रकल्प लवरच पुर्ण केला जाईल. हे काम पुर्ण होईपर्यत या रस्त्याची दुरूस्ती करून दळणवळण सुलभ केले जाईल अशी ग्वाही केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिली.
नगर-शिर्डी रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी खा. नीलेश लंके हे संसदेत गेल्यापासून मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. शुक्रवारी मंत्री गडकरी यांनी या प्रश्नावर संसदेत निवेदन केले. त्यावेळी त्यांनी हे काम लवकरात लवकर माग लावण्याची ग्वाही दिली. या रस्त्याचे काँक्रीटीकरण करावे ही मागणी खा. लंके यांनी केली आहे. त्याचा उल्लेखही गडकरी यांनी आपल्या निवेदनात केला.
गडकरी यांनी सांगितले की, नगर-शिर्डी रस्त्याचे नेमके काय झाले माहिती नाही, परंतू या रस्त्याच्या कामाच्या तिनदा निविदा निघाल्या. तीन ठेकेदार पळून गेले. एकाची बॅक गॅरंटी बनावट निघाली. आता पुन्हा दोनच ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहीती दिल्यानंतर या निविदा रद्द करण्यात सांगण्यात आले आहे. आता पंधरा दिवसांचे अल्प कालावधीची निविदा प्रसिध्द करून सुमारे अडीच हजार रूपये खर्चाचा हा प्रकल्प पुर्ण केला जाईल.
शिर्डीला भाविक येतात. त्यांना त्रास सहन करावा लागतो त्याचे मलाही दुःख होते आहे. तांत्रीक आणि आर्थिक निकष होते त्यात काही अंशी शिथिलता आणण्यात आली आहे. कारण आणखी ठेकेदार ही निविदा भरू शकतील. हा रस्ता काँक्रीटचा करण्याची मागणी तेथील लोकसभा सदस्यांनी केली आहे. त्याचा अभ्यास करून हे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. तोपर्यंत खराब झालेल्या रस्त्याची दुरूस्ती करून तो वाहतूकीसाठी योग्य राहील याची काळजी घेण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले.
रस्त्याची निविदा काढल्यानंतर निविदा रकमेच्या पन्नास टक्क्यांपर्यंत कमी त्या भरल्या जातात. हे थांबविण्यासाठी सरकारने काही उपाययोजना कराव्यात. त्यासाठी संबंधित ठेकेदार, अधिकारी यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे अशी मागणी यावेळी सभागृहात करण्यात आली, त्यावरही गडकरी यांनी उत्तर दिले.
पूर्वी मोठ-मोठी माणसे निविदा दाखल करत. त्यासाठीच आता तांत्रीक आणि आर्थिक बाबींमध्ये शिथीलता आणण्यात येत आहे. तसे केल्यामुळे आणखी काही लोक हे काम करू शकतील. ४२ टक्क्यांपासून ५० टक्क्यांपर्यंत कमी निविदा सादर करण्यात येत आहेत. हे थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून त्यामुळे कामे दर्जेदार होण्यास मदत होईल. काही बंधने आम्ही चांगल्या होतून घातली होती. मात्र त्याला यश आले नसल्याचे गडकरी म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles