Wednesday, April 17, 2024

मुलीच्या लग्नाचे निमंत्रण द्यायला गेलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू, नगर तालुक्याती घटना…

मुलीच्या लग्नाचे निमंत्रण नातेवाईकांना देण्यासाठी पती समवेत मोटारसायकल वर चाललेल्या महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी येथे शनिवारी (दि.३०) दुपारी घडली. सुवर्णा भाऊसाहेब भोर (वय ४०, रा. चास, ता.नगर) असे मयत महिलेचे नाव आहे.

मयत भोर यांच्या मुलीचे येत्या ५ एप्रिलला लग्न होते. त्याचे निमंत्रण नातेवाईकांना देण्यासाठी तसेच एका नातेवाईकाच्या घरी वाळकी येथे शनिवारी (दि.३०) दुपारी लग्न असल्याने त्या त्यांचे पती भाऊसाहेब भोर यांच्या समवेत मोटारसायकल वर चास येथून वाळकीला गेल्या होत्या.

वाळकी गावाजवळ शाळेच्या समोर गतिरोधकावर त्यांची मोटारसायकल आदळल्याने सुवर्णा या उडून रस्त्यावर पडल्या. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना पती व इतर नातेवाईकांनी तातडीने नगरला एका खाजगी रुग्णालयात नेले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

याबाबत डॉक्टरांच्या खबरीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सुवर्णा यांच्या पश्चात पती, १ मुलगा, १ मुलगी, सासू, दीर, भावजय असा परिवार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles