Monday, May 20, 2024

झोपलेल्याला दांडक्याने मारहाण ‘मद्दपी’ चा राडा, नगर तालुक्यातील घटना

अहमदनगर : तळीरामाने मंदिरासमोर शिवीगाळ करत एकास मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. १९) खारे कर्जुने (ता. नगर) येथील बिरोबा मंदिरात रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तळीरामाविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोंडीराम भानुदास भापकर (रा.खारे कर्जुने, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे.

याबाबत विशाल बबन गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री गायकवाड हे बिरोबा मंदिरात झोपले होते.
त्यावेळी तिथे भापकर आला. तो आरडाओरडा करू लागला. तेव्हा मी इथे झोपलो आहे, तू आरडाओरडा करू नकोस, असे ते म्हणाले. त्याचा त्याला राग
आला.त्याने बाजूला पडलेले लाकडी दांडके गायकवाड यांना उचलून मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles