Saturday, February 15, 2025

मटण खाल्ले नाही म्हणून पेट्रोल टाकून गज खुपसून खुन , नगर तालुक्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता

मटन खाल्ले नाही म्हणून फिर्यादीस पेट्रोल टाकून व गज खूपसुन खूनाच्या केसमधील आरोपींची निर्दोष मुक्तता..

‘केलेल्या

सदर घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, दि. १४/१०/२०१९ रोजी फिर्यादी मयत संजय पोपट जाधव यास आरोपी बापु एकनाथ हराळ, वय ४२ वर्ष

रा. गुंडेगाव, ता. जि. अहमदनगर याने यातील मयत फिर्यादी संजय पोपट जाधव, रा. गुंडेगाव, अहमदनगर यास मटनाचे जेवण करण्याकरीता घरी नेऊन फिर्यादीस जास्त मटन वाढुन ते फिर्यादीने खाल्ले नाही तरी त्यास आग्रह करुन खाण्यास लावले, ते जास्तीचे मटन फिर्यादीने खाल्ले नाही याचा राग धरुन यातील आरोपी बापु हराळ फिर्यादीस लाथा बुक्याने मारहाण केली व आरोपी ज्ञानदेव उत्तम कुसाळकर याने घराजवळ रामेश्वर मंगल कार्यालय आणुन फिर्यादीची पॅन्ट काढून त्यासोबत अनैसर्गीक संभोग करण्याचा प्रयत्न केला, त्यास फिर्यादीने नकार दिला म्हणून बापु हराळ याने फिर्यादीचे गुदद्वारात लोखडी गज घालून त्यास जखमी केले. बापु हराळ याने त्याच्या जवळील पेट्रोल क्वार्टर काढून ती फिर्यादीचे अंगावर ओतली, त्यावर आरोपी ज्ञानदेव कुसाळकर याने बापु हराळ यास फिर्यादी यास पेटवून दे अशी चिथावणी दिली व बापु हराळ याने काडी पेटीतील काडी फिर्यादीचे अंगावर टाकुन फिर्यादीस पेटवून दिले व फिर्यादीस जीवे ठार मारले. फिर्यादी हा ससून हॉस्पीटल येथे दि. १७/११/२०१९ रोजी उपचार घेत असताना मयत झाला. फिर्यादी याने विशेष कार्यकारी दंडाधिकारी, तहसिलदार व पोलीसांपुढे जबाब दिला होता.

सदर मृत्युपूर्व जबाबावरुन नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होऊन सदर गुन्ह्याचा तपास पुर्ण करुन अहमदनगर येथील जिल्हा न्यायालय येथे दोषारोपपत्र दाखल केले. सदर केसची सुनावणी मा. प्रधान जिल्हा न्यायाधिश श्री. एस.व्ही. यार्लागड्डा साहेब यांचे समक्ष होऊन सरकार पक्षाने १५ साक्षीदार तपासले; त्यामध्ये मयताचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविणारा साक्षीदार प्रत्यक्ष पाहणारा साक्षीदार, पंच, पोलीस यांची साक्ष नोंदविण्यात आली. आरोपींच्या वतीने मयत यास अज्ञात व्यक्तीने मारहान केली व पोलीसांनी सत्य परिस्थिती लपविली असा बचाव घेण्यात आला. मा. जिल्हा न्यायाधिश साहेब यांनी बचाव मान्य करुन आरोपी यांची केसमधून निर्दोष मुक्तता केली.

आरोपीकडून अॅड. महेश तवले, अॅड. संजय दुशिंग, अॅड. बी.डी. कोल्हे, अॅड. निलेश देशमुख, अॅड. विशाल काळे यांनी काम पाहिले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles