Wednesday, April 17, 2024

नगर तालुक्यात तुफान ‘राडा’ खुनी हल्ल्यात ९ जण झाले जखमी गुन्हा दाखल

टोळक्याने लाकडी दांडके, लोखंडी रॉड, कत्ती, फुकणी व फळीने केलेल्या खूनी हल्ल्यात ९ जण जखमी झाल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा शिवारात घडली. अजय सुभाष गवळी (वय २३ रा. शांजापुर ता. पारनेर, हल्ली रा. पिंपळगाव कौडा), आशाबाई दत्तात्रय शिंदे, सागर सुभाष गवळी, दत्तात्रय रामदास शिंदे, सुभाष बाजीराव गवळी, रामदास लक्ष्मण शिंदे, अदित्य दत्तात्रय शिंदे, अक्षय सुभाष गवळी व संगीता सुभाष गवळी (सर्व रा. पिंपळगाव कौडा) हे जखमी झाले आहेत.

जखमी अजय गवळी यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण शिवाजी गवळी, अरूण शिवाजी गवळी, शिवाजी बाजीराव गवळी, वैभव बाबा गवळी, बायजाबाई शिवाजी गवळी (सर्व रा. पिंपळगाव कौडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शनिवारी (दि. ९) रात्री नऊच्या सुमारास अजय गवळी व इतर त्यांच्या घरासमोर पिंपळगाव कौडा येथे उभे असताना तेथे किरण गवळी व इतर आले. त्यांच्या हातात लाकडी दांडके, लोखंडी रॉड, लोखंडी कत्ती, लोखंडी फुकणी, लाकडी फळी होती.

यांना सगळ्यांना आज संपवुन टाकु, यांची रोजची कटकट मिटुन टाकू असे म्हणून अजय गवळी व इतरांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. तुम्ही जर पोलिसांत तक्रार दिली तर तुम्हाला कायमचे संपवु, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles