Wednesday, April 17, 2024

वॉचमनचे हातपाय बांधुन LED TV चोरणारे जेरबंद, नगर तालुक्यातील घटना

वॉचमनचे हातपाय बांधुन LED TV चोरणारे जेरबंद,
10 LED TV हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री. सोपान भिकाजी शिकारे रा. धनगरवाडी, जेऊर, ता. नगर यांचे दिनांक 19/03/24 रोजी धनगरवाडी येथील शुभम ट्रेडर्स शोरुमचे पाठीमागिल बाजुचे लोखंडी शटर कशानेतरी उचकटुन आत प्रवेश करुन शोरुम मधील कामगार बाबुलाल राजभर याचे हातपाय पॅकिंग पट्टयांनी बांधुन शिवीगाळ, मारहाण करुन शोरुममधील 1,55,000/- रुपये किंमतीचे पीएचएक्स, सॅमसंग कंपनीचे 17 एलईडी व तांब्या पितळाचे भांडे बळजबरीने चोरुन नेले बाबत एमआयडीसी पो.स्टे.गु.र.नं. 262/24 भादविक 394, 34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
सदर घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना नमुद गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात तसेच अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, आकाश काळे, देवेंद्र शेलार, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे, भाऊसाहेब काळे व संभाजी कोतकर अशांचे पथक नेमून वरील प्रमाणे दाखल ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथकाने लागलीच घटना ठिकाणचे व आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्ह्याचा तपास सुरु केला तसेच रेकॉर्डवरील अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपीची माहिती घेत असताना पथकास वरील प्रमाणे दाखल गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे प्रविण काळे रा. छत्रपती संभाजीनगर याने त्याचे साथीदारांसह केला असुन तो फोर्ड फियागो गाडीत शुभम ट्रेडर्स मधील चोरी केलेला माला पैकी काही एलईडी विक्री करण्यासाठी नगर – छत्रपती संभाजीनगर रोडवरील पांढरीपुल, ता. नगर येथे साथीदारांसह येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी जावुन पहाणी करता 1 फोर्ड फियागो वाहन रस्त्याचे कडेला उभे असलेले पथकास दिसले. पथकातील सपोनि/थोरात यांनी काही अंमलदारांना बनावट ग्राहक म्हणुन संशयीतांशी संपर्क करण्यास सांगितले. त्यावर पथकातील अंमलदारांनी सदर फोर्ड फियागो वाहना जवळ जावुन संशयीतांशी चर्चा करुन एलईडी खरेदी करण्याची तयारी दाखवताच संशयीतांनी एलईडी कमी किंमतीत देण्याची तयारी दाखवल्याने पथकाची खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यास आरोपींना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) प्रविण श्रीधर काळे वय 24, रा. भेंडाळा, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 2) ज्ञानेश्वर मनोहर जाधव वय 28 व 3) संतोष अशोक कांबळे वय 23, दोन्ही रा. वाळुंज, ता. गंगापुर, जिल्ह छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे एलईडी बाबत विचारपुस करता त्यांनी अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर हायवे रोड वरील शुभम ट्रेडर्स येथुन चोरी केले असुन विक्री करता आणलेले आहेत असे सांगितल्याने आरोपींना 1,26,000/- रुपये किंमतीचे पीएचएक्स कंपनीचे 32 इंची 9 एलईडी, 14,000/- रुपये किंमतीचा 32 इंची एलईडी 1 एलईडी व 4,00,000/- रुपये किंमतीची फोर्ड फियागो कंपनीची गाडी असा एकुण 5,40,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन एमआयडीसी पो.स्टे. येथे हजर केले आहे. पुढील तपास एमआयडीसी पो.स्टे. करीत आहे.

आरोपी नामे प्रविण श्रीधर काळे हा गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द गंगापुर पोलीस स्टेशन जिल्हा छत्रपती संभाजीनगर गु.र.नं. 346/2023 भादविक 395 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

आरोपी नामे संतोष अशोक कांबळे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्दछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरीचे एकुण 3 गुन्हे दाखल आहेत. 1) वाळुंज पो.स्टे.गु.र.नं. 36/19 भादविक 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 4/25, 2) दौलताबाद पो.स्टे.गु.र.नं. 56/15 भादविक 392, 341, 506, 34 व 3) खेड पो.स्टे.गु.र.नं. 151/19 भादविक 379, 34 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. संपत भोसले साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
/

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles