Tuesday, May 7, 2024

पती- पत्नीचा वाद मिटविण्यासाठी गेले पण भलतेच घडलं, नगर तालुक्यातील घटना

अहमदनगर-पती- पत्नीचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी नगर तालुयातील पिंपळगाव माळवी येथे घडली. याप्रकरणी पुजा प्रशांत पवार (वय २७ रा. पिंपळगाव माळवी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या पतीसह सात जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामदेव लक्ष्मण चांदणे, नीलेश नामदेव चांदणे, राजु बबन पवार, किशोर बबन पवार, प्रशांत बबन पवार, आशाबाई बबन पवार, आश्विनी राजु पवार (सर्व रा. पिंपळगाव माळवी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पुजा व त्यांचे पती प्रशांत यांच्यात वाद असून गेल्या एक महिन्यापासून पुजा त्यांच्या माहेरी राहत आहे.मंगळवारी त्यांना वाद मिटविण्यासाठी फोन आल्याने त्या त्यांच्या भावांना घेऊन पिंपळगाव माळवी येथे गेल्या होत्या. तेथे असलेला नीलेश चांदणे हा आत बसून चर्चा करू असे म्हणत होता तर पुजाचा भाऊ सुनील त्यांना बाहेर बसूनच चर्चा करू म्हणत होते. यातून त्यांचात वाद झाले नीलेश व इतरांनी पुजा, त्यांचे भाऊ सुनील व दीपक यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदरची घटना घडल्यानंतर पुजा व त्यांचे भाऊ एमआयडीसी पोलीस ठाण्यात आले व त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस अंमलदार रजपुत अधिक तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles