Wednesday, April 17, 2024

नगर तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी रावसाहेब पाटील शेळके तर व्हा. चेअरमनपदी डॉ. मिनानाथ दुसुंगे

नगर : नगर तालुका खरेदी-विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून चेअरमनपदी रावसाहेब पाटील शेळके यांच्या नावाची सूचना संचालक दत्तापाटील नारळे यांनी मांडली तर अनुमोदन संचालक आसाराम वारुळे यांनी दिले, तसेच व्हा चेअरमनपदी डॉ. मिनानाथ दुसुंगे यांच्या निवडीची सूचना संचालक संजय धामणे यांनी मांडली तर अनुमोदन बाबासाहेब काळे यांनी दिले, यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, माजी सभापती विलास शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपककार्ले, संचलक संतोष म्हस्के, रेवन चोभे, सुरेश सुंबे, नूतन संचालक विठ्ठल पठारे, गोपीनाथ फलके, मंगेश बेरड, राजेंद्र ससे, अजिंक्य नागवडे, अशोक कामटे, मंगल ठोकळ, मीना गुंड, जीवन कांबळे, उत्कृष्ट कर्डिले, संतोष पालवे, आदी उपस्थित होते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी गोंड यांनी काम पाहिले.
यावेळी चेअरमन रावसाहेब पाटील शेळके म्हणाले की, खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील, याचबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जाईल, नगर तालुका खरेदी विक्री संघाचा आदर्शवंत असा कारभार करू. कै दादा पाटील शेळके यांना अभिप्रेत असे काम करू, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे नेतृत्वाखाली सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातील असे ते म्हणाले,
अक्षय कर्डिले म्हणाले की नगर तालुका खरेदी विक्री संघाने चांगले काम उभे करून जिल्हाभर नावलौकिक मिळावा सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर निवडणूक बिनविरोध झाली असून संचालक मंडळांनी देखील चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक केली आहे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू, विरोधकांना निवडणुकीत १० मतं देखील पडले नसते म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, असे ते म्हणाले
यावेळी उपस्थितांचे स्वागत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रभाजी सूळ यांनी केले तर आभार व्हा, चेअरमन डॉ. मिनानाथ दुसुंगे यांनी मानले

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles