अहमदनगर – नगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीने हॉटेल यश ग्रँड येथे बैठक संपन्न झाली. नगर तालुक्यामध्ये पंधरा वर्षापासून दादा पाटील शेळके, शशिकांत गाडे व राष्ट्रवादीचा गट हे मिळून महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलेले आहेत. व त्यानंतर मागच्या पाच वर्षांपूर्वी 2019 मध्ये याचाच बोध घेऊन राज्यात उद्धव ठाकरे, शरदचंद्रजी पवार व काँग्रेसचे नेते मिळवून यांनी देखील महाविकास आघाडी तयार केली होती. ही महाविकास आघाडी भाजपा सरकारला देखवत नसल्याने शिवसेनेमध्ये देखील फूट पाडून एका गटाला आपल्या सोबत घेतले त्याचप्रमाणे आत्ताच्या दहा दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाट्यमय घडामोडी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून दोन गट निर्माण करण्याचे काम देखील भाजपा सरकारने केले. राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना भारतीय जनता पार्टीमध्ये समाविष्ट करून उपमुख्यमंत्री पदाची व त्यांच्या सह असणारे आमदार यांना मंत्रिपदाच्या शपथविधीची वर्णी लावली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मधील महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांप्रमाणेच
नगर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये देखील संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. परंतु नगर तालुक्यातील नेते मंडळी जरी अजित पवारांसोबत गेले असले तरी नगर तालुक्यातील कार्यकर्ते हे शरद पवार व महाविकास आघाडी यांच्या सोबतच राहणार असल्याचे बैठकीत ठाम निर्णय घेण्यात आला असून या बैठकीत शिवसेनेचे शशिकांत गाडे सर समवेत प्रकाश पोटे, रोहिदास कर्डिले, रामदास भोर, राजेंद्र भगत, प्रताप पाटील शेळके, बाळासाहेब हराळ, संपत मस्के, लोटके सर, संदीप गुंड, संदेश कारले, डॉ.दिलीप पवार, जालिंदर शिंदे, गुलाब शिंदे, दिगंबर जरे, दत्तात्रय डोकडे, अनिल परभने, योगीराज गाडे, अरुण ससे, नाथा चव्हाण, अर्जुन सानप, निसार शेख, सोमनाथ काकडे, प्रसाद पवार, प्रवीण गोरे, निखिल शेलार, प्रकाश कुलट, प्रवीण कोकाटे, हर्षल म्हस्के, राहुल बहिरट, विलास शेंडाळे, किशोर शिकारे आदीसह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते