Wednesday, April 30, 2025

नगरच्या विजय शेवाळे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर

सरपंच परिषदेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर; दि.३ डिसेंबरला पुण्यात होणार वितरण
नगर – सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने देण्यात येणारे विविध राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर करण्यात आले असून नगर जिल्ह्यातून वडगाव गुप्ता (ता.नगर) येथील विजय शेवाळे यांना या वर्षीचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती सरपंच परिषदेच्या राज्य कोअर कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी दिली आहे.
या पुरस्कारांचे वितरण रविवारी (दि.३ डिसेंबर) पुणे येथे यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी (यशदा) बाणेर रोड, पुणे येथे राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, पद्मश्री पोपटराव पवार, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय काकडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
ग्रामिण भागात अत्यंत चांगले काम करणारे लोक प्रतिनिधी आ. ओमप्रकार उर्फ बच्चू कडू (अचलपूर), आ. अभिमन्यु पवार (औसा), आ. सुमनताई आर आर आबा पाटील (कौठे महांकाळ), आ. सुनिल शेळके (मावळ), आ. कृष्णा गजबे (आरमोरी) तसेच उत्कृष्ट काम केलेले मृद व जलसंधारण खात्याचे राज्याचे सचिव सुनिल चव्हाण (आष्टी), भिवंडीचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे (पारनेर), राज्याचे शिक्षण सचिव शैलेंद्र देवळानकर (पुणे), वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले पाटील (कोपरगाव), उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन ज्ञानेश्वर शेळकंदे (सोलापूर), गट विकास अधिकारी सतिष बुध्दे (सोतारा) यासह सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या पद्मश्री श्रीमती लिला फिरोज पुनावाला- (पुणे), एकनाथ विठ्ठल गाडे (जांभूळ ता. मावळ) यांचा विशेष पुरस्कार देवून गौरव होणार आहे.
यासह राज्यातील आदर्श सरपंच म्हणून विजय मुरलीधर शेवाळे (वडगावगुप्ता ता.जि. अहमदनगर), श्रीमती राजश्री भोसीकर (पानभोसी ता. कंदार नांदेड), दत्तात्रय खोटे (सांगवी,जि. बीड), श्रीमती ज्योती पाटील (मोहाडी ता.पाचोरा, जळगाव), चंद्रकांत पाटील (गणेशपुर ता. चाळीसगाव), पांडूरंग तोरगले (मासेवाडी ता. आजरा कोल्हापूर), जिजाभाऊ टेमगीरे (थोरांदळे ता. आंबेगाव जि. पुणे), सौ. निकिता रानवडे (नांदे ता. मुळशी जि.पुणे), श्रीमती सुनिता तायडे (गाते ता. रावेर), सदाशिव वासकर (पुंडवहाळ ता. पनवेल रायगड), सदानंद नवले (नाशिक) यांचा समावेश आहे. तर आदर्श ग्रामसेवक म्हणून आबासाहेब खिलारे (कहा जि.बीड), विजयसिंह नलावडे (धाराशिव), श्रीमती कमल तिडके (तावरे नांदेड) यांचा समावेश आहे. आदर्श शिक्षक सोमनाथ भंडारे (वडु बुद्रुक ता. शिरुर), उत्तम कोकीतकर (आजरा किटवडे कोल्हापूर), किशोर नरवाडे (चिखली नांदेड), शहाजी जाधव (गंजोटी उमरगा), यूवा उद्योजक म्हणून बाबु भैय्या उर्फ बाबासाहेब सुधाकर गर्ने (जिजाई मसाले, बावी, जि बीड) या मान्यवरांचा समावेश आहे.
सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. विकास जाधव, प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस, कोअर कमिटी अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, विश्वस्त आनंदराव जाधव, किसन जाधव, राणीताई पाटील, शिवाजी आप्पा मोरे, सौ. अश्विनीताई थोरात, सुप्रियाताई जेधे, सुधीर पठारे, नारायण वनवे आदी सह पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles