नगर अर्बन को. ऑप. बँक लि., अहमदनगर (मल्टी-स्टेट शेडयुल्ड बँक) संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेचे बँकींग परवाना दिनांक ४ ऑक्टोबर २०२३ रोजी कामकाजाचे वेळेनंतर रद्द केला आहे. बँकेवर विश्वास ठेऊन बँकेमध्ये ठेवीदारांनी ठेवलेला पैसा केंद्रीय निबंधक, नवी दिल्ली यांचेमार्फत पुढील आदेश पारीत झाल्यानंतर परत देणेबाबतचे प्रक्रिया सुरु करण्यात येईल.
दरम्यान बॅंक प्रशासनाने पत्रक काढून ठेवीदारांना दिलासा दिला आहे.
बँकेचे एकूण १ लाखापेक्षा जास्त सभासद असून बँकेच्या ३६ शाखा आहेत. तसेच बँकेचे एकूण रक्कम रुपये ३२२.५९ कोटीच्या ठेवी आहेत. ज्या ठेवीदारांच्या ठेवी बँकेकडे ठेवल्या आहेत त्यांच्या ठेवी सुरक्षित असून केंद्रीय निंबधक कार्यालयाकडून पारीत होणाऱ्या पुढील आदेशानुसार कामकाज होईल.
ठेवीदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. याबाबत काही शंका असल्यास बँकेच्या शाखा कार्यालयाचे ठिकाणी तसेच प्रधान कार्यालयात ठेवीदारांचे, ग्राहकांचे शंकांचे निरसन केले जाईल असे आवाहन बँकेचे प्रशासना मार्फत करणेत आले आहे.