नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक व कर्ज घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी देवेंद्र दिलीप गांधी आणि त्यांच्या पत्नी प्रगती देवेंद्र गांधी यांनी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्यांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश पी. आर. सित्रे यांनी नामंजूर केले आहेत.
बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळा प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.
अटकेत असलेल्या कर्जदार व बँकेच्या अधिकाऱ्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केले आहेत. तसेच, या व्यतिरिक्त काही जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत.
अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये देवेंद्र दिलीप गांधी आणि त्यांच्या पत्नी प्रगती देवेंद्र गांधी यांचा समावेश होता. त्यावर बँक बचाव समिती व ठेवीदारांच्या वतीने स्वतंत्रपणे बाजू मांडण्यात आली. न्यायाधीश सित्रे यांनी गांधी पती पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे.