नगर अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणांमध्ये डॉक्टर निलेश शेळके याला अटक केल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शेळके याला दिनांक 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख पोलीस उपधीक्षक अमोल भारती यांनी तपास सुरू केल्यानंतर फॉरेन्सिक अहवालामध्ये डॉक्टर निलेश शेळके यांचा कशा पद्धतीने सहभाग आलेला आहे हे सिद्ध झाले आहे. शेळके यांच्या बँकेच्या खात्यावर 10 कोटी रुपयांची रक्कम परस्परित्या कशा पद्धतीने आली तसेच इतर काही बाबी तपासा म्हणून आढळून आल्यानंतर काल डॉक्टर शेळके याला काल अटक करण्यात आली आज त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आले.
डॉक्टर शेळकेला न्यायालयामध्ये हजर केले असता सरकारी पक्षाच्या वतीने घडलेला गुन्हा हा अतिशय मोठा आहे. दोनशे ते चारशे कोटी रुपयांचा घोटाळा आहे ,या प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहे. या अगोदर पोलिसांनी काही संचालकांना तसेच बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना अटक केली आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. डॉक्टर शेळके यांच्या खात्यामध्ये दहा कोटी रुपये परस्परित्या जमा झालेले आहेत. नेमके हे कुठून कसे आले याचा पोलिसांना शोध घ्यायचा आहे. तसेच त्याच्यात अजून कोण कोण सामील आहे. याची सुद्धा पोलिसांना माहिती घ्यायची आहे गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे तसेच कागदपत्रांची पडताळणी ही करणे अजून बाकी आहे. आरोपी हा तपासात कोणत्याही प्रकारची मदत करायला तयार नाही. त्यामुळे आम्हाला या प्रकरणाचा तपास करायचा असल्यामुळे तसेच इतर बाबी सुद्धा फोरेन्सिक ऑडिटमध्ये आलेले आहेत. त्या सुद्धा लक्षात घेऊन आम्हाला तपास करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद न्यायालयामध्ये केला. तर आरोपी शेळके यांच्या वतीने माझ्या या गुन्ह्याशी काही संबंध नाही विनाकारण मला अटक आलेले आहे यासह विविध मुद्दे युक्तीवादामध्ये त्याच्या वकिलामार्फत मांडले न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर डॉक्टर शेळके याला दिनांक 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नगर अर्बन बँकेच्या गुन्ह्याची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहे काही संचालकांना या अगोदर अटक करण्यात आलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत कोतवली पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये डॉक्टर शेळके याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्या खात्यावर परस्परित्या पैसे जमा झालेले आहेत वास्तविक पाहता या अगोदर सुद्धा डॉक्टर शेळके याला फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली होती. त्यावेळेला सुद्धा अनेक बाबी या उजेडात आलेल्या होत्या त्यामुळे कशा पद्धतीने हा गुन्हा केला हे आता लवकरच उलगडला आहे तसेच या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे पोलिसांनी आता फॉरेन्सिक ऑडिटचा विषय हाती घेतला असून यामध्ये अनेक आजी-माजी संचालकांचा समावेश आहे गेल्या चार-पाच महिन्यापासून अनेक आजी-माजी संचालक हे नगरमध्ये नसून ते फरार झालेले आहेत पोलीस त्यांच्या सुद्धा शोध घेत आहे.