Saturday, March 2, 2024

नगर अर्बन बँक घोटाळा, अपहाराच्या रकमेतून माजी अध्यक्षांनी पत्नीच्या कंपनीच्या ४५ लाख खात्यात वर्ग..

अहमदनगर : नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्याच्या अनेक चुरस कथा आता समोर येऊ लागल्या आहेत. तीन कर्जदारांच्या खात्यातून ४५ लाख रुपये
पत्नीच्या नावे असलेल्या कंपनीच्या खात्यावर जमा केले. नंतर ही रक्कम रोख स्वरूपात काढली असल्याचाप्रकार पोलिस तपासात समोर आला आहे.दरम्यान, अटकेत असलेला बँकेचा माजी अध्यक्ष अशोक कटारिया याला न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.५) पोलिस कोठडी दिली आहे.नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने माजी अध्यक्ष अशोक कटारिया याला अटक केल्यावर न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. त्याला शनिवारी तपासी अधिकारी तथा पोलिस अधीक्षक हरीश खेडकर यांनी न्यायालयात पुन्हा हजर केले.

यावेळी पोलिसांनी तपासाची माहिती दिली. सरकारी पक्षाच्या वतीने मंगेश दिवाणे यांनी युक्तिवाद केला. सन २०१८ मध्ये नगर अर्बन बँकेच्या तीन कर्जदारांच्या बँक खात्यातून प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे एकूण ४५लाख रुपये माजी अध्यक्ष अशोक कटारिया याच्या पत्नीच्या नावे असलेल्या कंपनीच्या बँक खात्यात वर्ग झाल्याचे फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. हा व्यवहार संशयास्पद असून, याबाबत तपास करणे आवश्यक आहे. सदर कंपनीच्या कागदपत्रांची आरोपीकडे मागणी केली होती; परंतु अद्याप कंपनीची कागदपत्रे प्राप्त झालेली नाहीत.

या कंपनीची सर्व कागदपत्रे हस्तगत करून तपास करणे आवश्यक आहे.याशिवाय कटारिया हा बँकेत संचालक, अध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर कार्यरत होता. या पदांवर काम करताना त्याने यातील आरोपी कर्जदारांची कुवत नसताना कर्जाकरिता तारण मालमत्तेचे बनावट, तसेच वाढीव दराचे मूल्यांकन अहवाल घेऊन त्यांना कमालमर्यादेचे कर्ज मंजूर केलेले आहे. त्या बदल्यात आरोपीला काय मोबदला मिळाला, याबाबत विचारणा केली असता आरोपीकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. आरोपीने संगनमत करून कर्ज मंजूर केले असून, त्याबदल्यात कर्जदारांकडून मोठमोठ्या रकमा रोख स्वरूपात घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या रकमेतून आरोपींनी स्वत:च्या,

नातेवाईक आणि मित्रांच्या नावे काही मालमत्ता खरेदी केल्या असण्याची शक्यता आहे. याबाबत आरोपीकडे विचारणा करण्यात आली होती; परंतु
कोणती आरोपीकडून माहिती मिळालेली नसून, उडवाउडवीची उत्तरे असल्याचे दिली जात तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles