Sunday, July 21, 2024

नगरकर भूल थापाला बळी न पडता विकास कामाच्या पाठीमागे उभे राहतात -आ. संग्राम जगताप

वाल्मीक मेहतर समाजाच्या वतीने आ. संग्राम जगताप यांची भेट घेत सर्जेपुरा येथील गोगादेव मंदिराबाबत केली चर्चा

नगरकर भूल थापाला बळी न पडता विकास कामाच्या पाठीमागे उभे राहतात – आ. संग्राम जगताप

नगर : वाल्मीक समाजाचे भगवान वीर गोगादेव मंदिर हे श्रद्धास्थान असून एक आत्मा आहे सर्जेपुरा येथील श्री गोगादेव मंदिरा बाबतच्या जागे संदर्भात काही राजकीय लोकांकडून समाजामध्ये गैरसमज पसरवण्यात आले या संदर्भात वाल्मीक मेहतर समाजाच्या वतीने आ. संग्राम जगताप यांची भेट घेत सांगितले की सर्व समाज बांधव तुमच्याबरोबर आहोत तुम्ही सर्व जातीतील समाज बांधवांना बरोबर घेऊन शहर विकासाचे चांगले काम करत आहे यासाठी नेहमीच आमचे सहकार्य राहील असा विश्वास वाल्मीक समाजाच्या वतीने आ. संग्राम जगताप यांना देण्यात आला
नगर शहर व भिंगार येथील वाल्मीक मेहतर समाजाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत चर्चा केली यावेळी अनिल तेजी, बिल्लू घावरी, सुखराम तेजी, प्रविण घावरी, किशोर वाणे, दिपक मट्टू, पै अनिल वाणे, सुरेश तेजी, गुलाब गोहेर, अनुप चव्हाण, अनिल पापा सारसर, रवि मोरकरोसे, प्रमोद आठवाल, जय चव्हाण, अजय सौदे, वीरू चव्हाण, राजेश तेजी,आकाश करोसीया, विशाल झुंज, प्रशांत आठवाल, भगवान राजपाल, रमेश चव्हाण, निर्मल बगगन, सुदेश चव्हाण, तालेवार गोहेर, शुभम टाक, सनी खरारे, राहुल लखन, आकाश चोहान, आशिष तेजी, कुणाल वाणे, प्रताप सौदे, सोनू गुलाब गोहेर, भारत घावरी, रोहित बागडी, राहुल बागडी, सुमित तेजी, रितेश निदान यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, धार्मिक व अध्यात्मिकतेतून समाज घडला जात असतो, भगवान वीर गोगादेव मंदिर समाजाचे श्रद्धास्थान असून वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत असतात, त्या माध्यमातून आपली परंपरा व संस्कृती जोपासली जात असते विविध जाती धर्मातील श्रद्धास्थान असणारे मंदिर उभे राहावे यासाठी आम्ही काम करत आहोत, नगरकर भूल थापाला बळी न पडता विकास कामाच्या पाठीमागे उभे राहत असतात, आपण सर्वजण मिळून धार्मिकते बरोबर शहर विकासाच्या कामाला गती देऊ असे ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles