नागपूर जिल्ह्यातील काटोल मध्ये क्वालीस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. काल मध्यरात्रीनंतर काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान ही घटना घडली.
क्वालिस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात होती. त्यावेळी ट्रकने जोरदार धडक दिली आणि त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात एका लग्नाचा कार्यक्रम आटपून हे सर्वजण काटोलच्या दिशेने जात होते.