प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूर येथे विधानसभेत दमदार भाषण केलं. राज्यात शांतता ठेवायची असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज प्रकाश आंबेडकर यांनाच मुख्यमंत्री केलं पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.
आम्ही आठ वर्षे मराठा मुख्यमंत्र्याला दिली. पण त्यांनी मराठ्यांना काहीच दिलं नाही, असा आरोप बच्चू कडूंनी आपल्या भाषणात केला. शिवाय राज्यात दलित, माळी किंवा तेली समाजाचेही मुख्यमंत्री व्हायला हवेत, अशी मागणीही त्यांनी केली.
विधानसभेत केलेल्या भाषणात बच्चू कडू म्हणाले, “राज्यात शांतता ठेवायची असेल तर पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज प्रकाश आंबेडकर यांनाच मुख्यमंत्री केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या देशाला घटना दिली, त्यांच्या वंशजासाठी आपण किमान एवढं तरी केलं पाहिजे. अशा पद्धतीने पुढे जायला काय हरकत आहे.”