हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून, यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार फटकेबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्याची तिजोरी बारामतीला आहे, पण त्याची एक किल्ली ठाण्यात असून ओरिजनल चावी मात्र नागपुरात असल्याचा,” खोचक टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे.
दरम्यान, यावेळी बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, बीड मधील जाळपोळीच्या घटनेनंतर पोलीस हात बांधून का उभी होती?, बीडमधील झालेली जाळपोळीची घटना दुर्दैवी आहे. सोलापूरात ड्रग्जचे कारखाने सापडले. त्यामुळे, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात ड्रग्जचे कारखाने कुठून आले. गृहमंत्री तुम्ही अनुभवी आहात, मात्र, सरकार तिघांचे असल्याने मी का जबाबदारी घेऊ अशी भूमिका नको पाहिजे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाच आणि ड्र्ग माफियाचे जाळ गुजरातपर्यत जोडले गेले. राज्यातील मंत्रीचे नाव या प्रकरणात येतात यावर खुलासा कधी करणार?, नाशिक प्रकरणात बात निकलेगी तो दूर तक चली जायेगी, असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच, राज्याची तिजोरी बारामतीला आहे, पण त्याची एक किल्ली ठाण्यात असून ओरिजनल चावी मात्र नागपुरात असल्याचं देखील वडेट्टीवार म्हणाले.