Friday, January 17, 2025

आपापल्या भागातील छोटे छोटे पक्ष संपवा… बावनकुळेंचा भाजप कार्यकर्त्यांना मंत्र..

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आपआपल्या जिल्ह्यातील छोट्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या आणि गाव तसेच शहरातील छोटे पक्ष संपवा, असे थेट आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात शनिवारी आयोजित या मेळाव्याला केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते, आमदार प्रवीण दटके उपस्थित होते. यावेळी बावनकुळे म्हणाले, विविध राजकीय पक्षांचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे प्रत्येक बुथ प्रमुखांनी आपआपल्या जिल्ह्यातील जे छोटे पक्ष असतील अशा राजकीय पक्षातील किमान ५० पदाधिकांऱ्यांना आपल्या पक्षात घ्यावे आणि छोटे पक्ष संपवावे. मला काय दिले यापेक्षा पक्षासाठी मी काय करु शकतो याचा विचार प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी करावा.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles