जित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही. यामुळे भुजबळ कमालीचे संतप्त झाले आज छगन भुजबळ यांनी थेट हल्लाबोल केला. मनोज जरांगे यांना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. तसेच मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं, तरी भुजबळ संपला नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले. तसेच मी सामन्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो. मंत्रिपदं आली गेली…भुजबळ कधी संपला नाही, असंही ते म्हणाले. ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला मोठं यश मिळालं. तसेच अजित पवारांशी मी चर्चा केली नाही आणि मला तशी गरजही वाटली नाही, असंही छगन भुजबळ यांनी सांगितले.
जरांगे यांना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं..छगन भुजबळ यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया
- Advertisement -