Tuesday, June 25, 2024

भावी खासदार कोण होणार? पारावर चर्चा सुरू असतानाच तरुणांमध्ये राडा; एकाचा जागीच मृत्यू

लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार? यावरुन झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरमध्ये घडली. नागपुरच्या नरखेड तालुक्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.ही धक्कादायक घटना नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावातील आहे. रामटेक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या या गावात लोकसभा निवडणुकांच्या निकालावरुन जोरदार राडा झाला. यावेळी झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेने संपूर्ण नागपूर जिल्हा हादरुन गेला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गावातील पारावर बसलेल्या तरुणांमध्ये रामटेक लोकसभा निवडणूक कोण जिंकणार? यावर चर्चा सुरू होती. ही चर्चा सुरू असतानाच वाद वाढत गेला आणि त्याचे पुनर्वसन जोरदार हाणामारीत झाले.या मारहाणीत जबर मार लागल्याने सतीश फुले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी प्रवीण बोरडे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, लोकसभेच्या निकालावरुन झालेल्या या हत्येने परिसर हादरुन गेला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles