राज्यात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर तब्बल 23 दिवसांनी राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार संपन्न झाला आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी मुंबईत झाला होता. त्यानंतर, रविवारी नागपूरमध्ये 39 मंत्र्यांचा शपथविधी झाला असून सोमवारी 16 डिसेंबरपासून राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या तीन प्रमख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत विचारले असता, दोनच दिवसांत खातेवाटप पूर्ण होईल, असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी, अजित पवार मुख्यमंत्री कधी होतील, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता, त्यावर अजित पवारांनीच मिश्कीलपणे उत्तर दिले.
मी अडीच महिन्यासाठी ही होऊ शकतो, असे अजित पवारांनी म्हणताच एकच हशा पिकला.