नागपूर: कॉंग्रेसशी संबंधित अनिल वडपल्लीवार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात लाडकी बहीण योजनेच्या विरोधात याचिका केली आहे. वडपल्लीवर यांचे संबंध काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्याशी आहे. सरकारतर्फे निष्णात वकील न्यायालयात उभा केला जाईल आणि ही योजना बंद होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महिलांवरील अत्याचाराबाबत फडणवीस म्हणाले, ‘‘ही समाजाला लागलेली कीड आहे. ती थांबवण्यासाठी महिला ही उपभोगाची वस्तू नव्हेतर ती माता, आई, बहीण असल्याची घराघरांत शिकवण दिली गेली पाहिजे. पण, अत्याचार करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही. त्यांना कठोर शिक्षा केली जाईल,’’असेही फडणवीस म्हणाले.
लाडकी बहिण योजना अडचणीत? कॉंग्रेसकडून योजने विरोधात हायकोर्टात याचिका
- Advertisement -