विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर आणि विशेष करून युती सरकारमधील मंत्र्यांवर आरोप केले जात आहेत. असेच आरोप भाजपच्या मंत्र्यावर आरोप केले गेले. पण या मंत्र्याने थेट राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. विधानपरिषदे रोजगार उद्योगता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर आरोप केले अन् लोढा यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याची तयारी दाखवली.विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाषणात मंगलप्रभात लोढा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केले. त्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मंगलप्रभात लोढा यांनी सभागृहात थेट कोऱ्या कागदावर सही केल्या अन् राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. आपण कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम करत नसल्याचं लोढा यांनी यावेळी सांगितलं. तसंच जर आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करा, असं जाहीर आव्हान लोढा यांवी दानवेंना दिलं.मी 10 वर्षांपासून मी माझ्या कुटुंबाच्या व्यवसायात नाही. जर माझ्या कुटुंबियांकडून अवैध व्यवसाय होत असेल तर मी कोऱ्या चिठ्ठीवर राजीनामा लिहून आणला आहे. एकही अनधिकृत बांधकाम केलेलं नाही. आम्ही अधिकृत व्यवसाय करत नाही. मी माझ्या पदाचा कधीही गैरवापर करत नाही, असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.
विरोधकांनी केले आरोप.. भाजप मंत्र्याने कोऱ्या कागदावर सही करीत राजीनामाच…
- Advertisement -