Saturday, January 25, 2025

मोठी बातमी…हिवाळी अधिवेशन चालू असताना अजितदादा ‘नॉट रिचेबल’

महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले आहे. मात्र यामुळे मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या २४ तासांपासून नॉट रिचेबल आहेत. यावर आता एका मोठ्या नेत्याने गौप्यस्फोट केला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारामध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. सध्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. मात्र अजित पवार हे या अधिवेशनात उपस्थित राहिलेले नाहीत. गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी मोठी टीका केली आहे.

छगन भुजबळ या वयात काय बंड करणार? जर बंड करायचं असते तर त्यांनी आधीच केलं असतं. पण आता ते काय बंड करणार, त्यांचे वय होऊन गेले. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालेला नाही. छगन भुजबळांचा राग ओढवून घ्यायला नको. समोरासमोर यायला नको म्हणून अजितदादा नॉट रिचेबल झाले असतील, असा गौप्यस्फोट भास्कर जाधव यांनी केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles