भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला आलेल्या तावडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंना टार्गेट केले.
2019 ला विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप-शिवसेना युतीचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. पण ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी गद्दारी केली. यामुळे एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यानंतर अजित पवारही शिंदे-फडणवीस सरकारसोबत आले. उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली नसती तर अजित पवारांना सोबत घेतले नसते, असे तावडे म्हणाले.