नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच आता नागपुरातील मेडिकल-मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतही २४ तासांत २५ मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांवर राज्यातील विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातीलही अत्यवस्थ रुग्णांचा भार आहे. मेडिकलमध्ये २ ऑक्टोबरला २४ तासांत तब्बल १६ आणि मेयो रुग्णालयात ९ रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेला. हे रुग्ण वेगवेगळ्या वयोगटातील आहेत. मेडिकलला दगावलेल्या एकूण रुग्णांपैकी ८ रुग्ण हे खासगी रुग्णालयांतून अत्यवस्थ अवस्थेत या ठिकाणी आले होते. या रुग्णांना मेडिकलच्या डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात हलवले. परंतु २४ तासांच्या आत त्यांचा मृत्यू झाला. मेयोतही हीच स्थिती होती.
- Advertisement -