Monday, June 17, 2024

मतमोजणी आधी राजकारण तापले… केंद्रीय गृह मंत्रालयाने १५० जिल्हाधिकाऱ्यांना धमकावले…

नागपूर : आम्ही सर्व उमेदवारांना सांगितले आहे, की शेवटचे मत मोजल्याशिवाय मतमोजणी केंद्रातून बाहेर पडायचे नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाने १५० जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावले असल्यामुळे भाजप यातून घाबरले असल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

पटोले नागपुरात बोलत होते. ते म्हणाले, ही निवडणूक मोदी सरकारविरोधात जनता अशी झाली आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी न्याययात्रेच्या माध्यमातून ‘गॅरंटी’ दिली. जनता विरुद्ध सरकार अशी निवडणूक झाली आहे. त्यामुळे ‘एक्झिट पोल’मध्ये भाजपच्या बाजूने निकाल लागले असले तरी देशात आम्हाला बहुमत मिळणार आहे. देशात यंदा निवडणुकीदरम्यान अटीतटीची लढाई झाली आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने १५० जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावले आहे. मात्र, विजय हा इंडिया आघाडीचा होणार, ‘एक्झिट पोल’ला कुणीही घाबरायचे नाही, असे कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles