Wednesday, April 30, 2025

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रासाठी ‘पनौती’…

हे सरकार शेतकऱ्यांचे, सामान्यांचे सरकार आहे,’ असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज कडाडून टीका केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे महाराष्ट्रासाठी ‘पनौती’आहे, असा हल्लाबोल तुपकरांनी मुख्यमंत्र्यांवर केला.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मंगळवारी तुपकरांनी विधानभवनावर मोर्चा काढला आहे. विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली. शेकडो शेतकऱ्यांसह तुपकर यांचा ताफा महाराजबाग चौकात अडवण्यात आला. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र, रविकांत तुपकर विधानभवाकडे जाण्यावर ठाम होते. तुपकर यांना पोलिसांनी रस्त्यातच अडवले. यावेळी पोलिस आणि तुपकर यांच्यात खडाजंगी झाली. विधानभवनासमोर तुपकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणजे बोलायचीच कढी अन् बोलायचाच भात’ आहे, असे तुपकर म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles